विशाल पाडाळे, झी मीडिया, लोणावळा : काहीही न खाता पिता वर्षानुवर्षं ध्यानधारणा, तपसाधना करणाऱ्या ऋषींच्या गोष्टी आपण पुराणांत ऐकल्यायत... पण सध्या असा एक योगी देशोदेशी फिरतोय... त्यानं गेल्या अठरा वर्षांत काहीही खाल्लेलं नाही... एलटोम एल अमीन असं त्याचं नाव... सध्या लोणावळ्यात ध्यानधारणेचे धडे देतोय.
एलटोम हा मूळचा अमेरिकेतल्या ओहयोमधला... या अवलियानं गेली १८ वर्षं काहीही खाल्लेलं नाही... पाण्याचा एकही घोट घेतलेला नाही... तरीही तो उत्तम आणि निरोगी आयुष्य जगतोय... ध्यानधारणेच्या माध्यमातून एलटोमनं हे शक्य केलंय... आणि आता तो याचा प्रसार आणि प्रचार करत देशोदेशी फिरतोय.
एलटोम एल अमीनचं काही वर्षांपूर्वी प्रचंड वजन होतं... सुरुवातीला त्यानं मांसाहार वर्ज्य केला... मग दुग्धजन्य पदार्थांचा त्याग केला... त्यानंतर ध्यानधारणेनं काहीही खाता न पिता निरोगी जगणं शक्य असल्याचं त्याच्या वाचण्यात आलं आणि त्यानं या प्रयोगाला सुरुवात केली... गेली अठरा वर्षं त्यानं हा यशस्वी प्रयोग केलाय... ज्यांना एलटोम एल आमीनची ही प्रक्रिया सुरू करायचीय, त्यांच्यासाठी आमेन...