मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणी विरोधकांच्या दबावाला बळी पडायचं नाही. अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतलीय. विधानसभेत आज हिरेन मनसूखप्रकरणी कारवाईसाठी विरोधक दबाव आणणार आहेत.
वाझेंवर सध्या कारवाई केली तर विरोधकांच्या दबावाला सरकार बळी पडले असं चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या दबावामुळे संजय राठोड यांच्या राजीनामा घेतल्याचं चित्र निर्माण झालंय. ते त्यांना परत निर्माण होऊ द्यायचं नाही. त्यामुळे आता तपास पूर्ण झाल्यावरच वाझेंवर कारवाईचा निर्णय होणार आहे. तपासानंतर वाझे दोषी आढळले तर कारवाई करण्याची महाविकास आघाडीची भूमिका आहे. विरोधक आजही विधानसभेत वाझेंवर कारवाईसाठी दबाव आणणार आहे.
हिरेन कुटंब भयभीत असल्याचं वक्तव्य सोमय्या यांनी केलं. तर सचिन वाझे, गावडे ही पोलीस गँग काहीही करु शकते असा आरोप करत, हिरेन कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणही सोमय्या यांनी केलीय.