अमर काणे, झी मीडिया, नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 'सिल्वहर ओक' या मुंबईतील घरावर 8 एप्रिलला एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यावरुन चांगलंच राजकारण तापलेलं पाहायला मिळालं. हा हल्ला एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या सागंण्यावरुनच करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. या हल्ल्यामागे अनेक कनेक्शन असल्याचंही म्हटलं जात आहे. दरम्यान या हल्ल्यामागे असलेलं नागपूर कनेक्शन उघड झालंय. (mumbai police arrested to sandeep godbole in nagpur to for sharad pawar home silver oak attack matter)
सिल्वर ओक वर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन प्रकरणी मुंबई पोलिसांनी नागपुरातून एकाला ताब्यात घेतलंय. पोलिसांनी संदीप गोडबोले (Sandeep Godbole) नावाच्या बडतर्फ एसटी कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलंय. संदीप गोडबोले हा एसटी महामंडळात यांत्रिक पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे.
संदीप गोडबोले हा वकील गुणवंत सदावर्ते यांच्यासोबत हल्ल्याच्या दिवशी संपर्कात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आता गोडबोलेला मुंबई पोलीस घेऊन गेली आहे.
दरम्यान सिल्वहर ओक हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने पोलीस कोठडी 2 वेळा पोलीस कोठडी सुनावली. मात्र त्यानंतर आज सदावर्ते यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.