मुंबई : आसनगाव-वाशिंद येथे नागपूरहून येणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसचे नऊ डबे घसरल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल आहेत.प्रवाशी आणि त्यांचे नातेवाईक सध्या प्रचंड तणावाखाली आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी प्रवाशांच्या मदतीसाठी मध्य रेल्वेने हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत.
मदतीसाठी या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे. यासंबंधीचे ट्वीट म.रे ने केले आहे.
या अपघाताचा इतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही परिणाम झाला आहे. या अपघातामुळे नागपूरहून येणाऱ्या विदर्भ एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेस आणि सेवाग्राम एक्सप्रेस मनमाड येथे खोळंबल्या आहेत.
More helpline numbers#NagpurCSMTDuranto derailment@RailMinIndia
Bhusaval
02582-222286
Nasik Road
0253-2467863
Manmad
02591-222345— Central Railway (@Central_Railway) August 29, 2017
#NagpurCSMTDuranto derailment
Help lines. CSMT 22694040, Thane 25334840, Kalyan 2311499, Dadar 24114836, Nagpur 2564342— Central Railway (@Central_Railway) August 29, 2017
रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान सात तास लागणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने अनेक प्रवाशांचे नियोजन विस्कळले आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने तात्काळ हेल्पलाइन नंबर जारी करून यावरुन माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.
> छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- २२६९ ४०४०
> ठाणे - २५३३ ४८४०
> कल्याण- २३११ ४९९
> दादर - २४११ ४८३६
> नागपूर - २५६४ ३४२
> भुसावळ- ०२५८२- २२२२८६
> नाशिक रोड - ०२५३-२४६७८६३
> मनमाड - ०२५९१- २२२३४५