नंदुरबार : ४१ अंश सेल्सिअस तापमानात नदीला कधी पूर आल्याचं आपण पाहीलयं का? नाही ना... मात्र, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमाभागात झालेल्या अवकाळी पावसामुळे नद्यांना पूर आलाय.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात अवकाळी पावसाला सुरूवात झाली. मध्यप्रदेशातील बडवानी, खरगोन, सेंधवा आणि महाराष्ट्रातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने सुसरी नदीला पूर आला.
अवकाळी आलेल्या या पूरामुळे उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नदी काठावरील हजारो नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.
अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल ही भीती मनात असताना पूरस्थितीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. एप्रिल महिन्यात नदीला आलेला पूर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.