मुंबई : आजपासून शारदीय नवरात्रीला सुरूवात झाली आहे.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख पीठ असलेली कोल्हापूरची अंबाबाईची नवदुर्गामधील प्रथम दुर्गा शैलपुत्रीच्या रुपात बैठी सालंकृत पूजा बांधण्यात आली आहे.
शैलपुत्री ही हिमालयाची कन्या आहे. ही भगवान शंकराची पत्नी आहे. हिचे वाहन वृषभ असून ही द्विभूजा आहे.ही यश देणारी असून हिच्या उपासनेने मनातील इच्छा पूर्ण होतात, अशी देवी उपासकांची श्रद्धा आहे.
गुरूवारी पहाटेच्या अभिषेकानंतर सकाळी साडे आठ वाजता शेखर मुनिश्वर कुटुंबीयांकडून अंबाबाईची घटस्थापना करण्यात आली. तोफेची सलामी झाल्यानंतर देवी बसली असे संबोधले जाते. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचेअध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला. दुपारची आरती शंखतीर्थनंतर अंबाबाईची शैलपुत्री रुपात बैठी सालंकृत पूजा बांधण्यात आली.