Rohit Pawar Belgaum: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Belgaum border dispute) पुन्हा उफाळला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी (Basavaraj Bommai) केलेल्या सीमाभागावरील वक्तव्यानंतर दोन्ही राज्यातील राजकीय वातावरण (Maharastra Politics) तापल्याचं पहायला मिळतंय. महाराष्ट्राच्या नेत्यांनी बेळगावात येऊ नये, असा इशारा बोम्मई यांनी दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी 48 तासांचा अल्टीमेटम देत राज्यातील मंत्र्याच्या अडचणी वाढवल्या. त्यानंतर आता गनिमी काव्याचा वापर करत रोहित पवार (Rohit Pawar in Belgaum) बेळगावात पोहोचल्याचं पहायला मिळतंय.
बेळगावात गेल्यानंतर तेथील मुख्य असलेल्या राणी चन्नमा चौकात (Rani Chennamma Choak) जाऊन फोटो शेअर केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली. बेळगावात माझे अनेक नातेवाईक आहेत. बेळगाव हा कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रात असल्यासारखे वाटतं. पवार साहेबांनी (Sharad Pawar) अल्टीमेटम दिल्यावर वातावरण शांत झालंय. मी आलोय, सत्ताधाऱ्यांनी हे धाडस करून दाखवावं, असं खुलं आव्हान रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यावेळी दिलं आहे.
बेळगाव शहरातील दख्खनचा राजा जोतिबा मंदिराचे (Jyotiba Temple, Belgaum) दर्शन घेतलं. मराठी भाषिकांच्या लढ्याला यश येऊन बेळगावसह संपूर्ण मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा, यासाठी दख्खनचा राजा जोतिबाला यावेळी साकडं घातलं, असं रोहित पवार म्हणाले आहेत. रोहित पवार यांनी ट्विट करत फोटो देखील शेअर केले आहेत.
राणी चेनम्मा चौक...
हीच ती जागा...
ज्या ठिकाणी १ जून १९८६ रोजी… pic.twitter.com/fpkh5c5FKR— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 13, 2022
दरम्यान, रोहित पवार बेळगावात पोहोचल्यावर संजय राऊतांनी (Sanjay Raut) ट्विट करत रोहित पवारांचं कौतूक केलंय. जय महाराष्ट्र! मंत्री पोहोचले नाहीत. पण रोहित पवार बेळगावात पोहोचले. इच्छा आणि हिम्मत असली की आडवे येणारे पळून जातात, असं संजय राऊत यांनी ट्विट (Sanjay Raut Tweet) करत म्हटलं आहे.