परभणी : शहरातील 44 वर्षीय प्रसिद्ध उद्योजक तसंच बॅडमिंटनपटू सचिन तापडिया यांचा बॅडमिंटन खेळत असतांना हार्टअटॅकने मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. सचिन तापडिया हे नियमित बॅडमिंटन खेळण्यासाठी परभणीच्या बॅडमिंटन हॉलमध्ये येत होते.
सकाळी बॅडमिंटनचा पहिला राऊंड पूर्ण केल्यानंतर ते पाणी पिण्यासाठी थांबले. पाणी पीत असतांना त्यांना अचानक हार्टअटॅक आला. त्यांना तत्काळ एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्यावेळी डॉक्टरांनी तापडिया यांना तपासून मृत घोषित करण्यात आलं. बॅडमिंटन कोर्टवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही दृश्य कैद झाली आहेत.
सचिन तापडिया हे एका ऑटो कन्सल्टन्सीचे मालक आहेत. सचिन तापडिया यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.