पुण्यात चाललंय काय? इंग्रजी शाळेत बाऊन्सरकडून पुन्हा पालकांना धक्काबुक्की

शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाला शाळेकडून केराची टोपली

Updated: Apr 4, 2022, 12:59 PM IST
पुण्यात चाललंय काय? इंग्रजी शाळेत बाऊन्सरकडून पुन्हा पालकांना धक्काबुक्की title=

पुणे  : बिबबेवाडी इथल्या क्लाइन मेमोरियल शाळेनंतर पुण्यातील उंड्री इथल्या युरो शाळेत बाऊन्सरकडून पालकांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 

शालेय शुल्काबाबत काही पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्या होत्या. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तक्रारी केल्या होत्या, त्या विद्यार्थ्यांना शाळेने मेलद्वारे नोटीस पाठवण्यात आली. तसंच या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारण्यात आला.

याचा जाब विचारण्यास गेलेल्या पालकांना शाळेच्या गेटवर रोखण्यात आलं. तसंच बाऊन्सरकडून काही पालकांना धक्काबुक्कीही करण्यात आली. याचा व्हिडिओ एका दक्ष पालकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बिबवेवाजी इथल्या शाळेतील बाऊन्सरकडून पालकांना झालेल्या धक्काबुक्कीचा मुद्दा विधानसभेतही उपस्थित करण्यात आला होता. यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाऊन्सर न ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाला शाळेकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे.