ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ठाण्यातील सभेत पुन्हा एकदा मराठीच्या मुद्याला चर्चेत आणत थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.
मराठी पाट्यांच आंदोलन मला पुन्हा हातात घ्यावं लागेल असं दिसतंय कारण अजून काही लोकांना हे समजत नाहीये असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगतात की कर्नाटकात राहायचं असेल तर कन्नड भाषेत बोलावं लागेल, अशी हिम्मत आहे का देवेंद्र फडणवीसांमध्ये? असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरेंनी पुढं म्हटलं की, "बुलेट ट्रेनला माझा विरोध आहे कारण त्यांचे हेतू स्वच्छ दिसत नाहीयेत. मोदी पंतप्रधान झाल्यावर मी म्हटलं होतं की आता गुजरातचा नाही देशाचा विचार करा. बुलेट ट्रेन सुरु करताना अहमदाबादचा विचार कसा येतो? जर मोदींना गुजरातचं प्रेम वाटू शकतं तर राज ठाकरेला महाराष्ट्राचं प्रेम का वाटू नये?"