पुणे : Raj Thackeray's Rally place was fixed in Pune : राज ठाकरेंच्या पुण्यातल्या सभेचा मार्ग मोकळा झालाय.आता पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. औरंगाबाद, ठाण्यानंतर आता पुण्यात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. पुण्यातील राज ठाकरे यांच्या सभेची जागा ठरली. डेक्कन नदी पात्रात होणार सभा होणार आहे. आजपासून राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पक्षांतर्गत वाद मिटणार का याकडे लक्ष, लागले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी पुण्याकडे रवाना झाले आहेत. पुण्यातील मनसे अंतर्गत वाद तसेच पुण्यात मनसेची सभा या पार्श्वभूमीवर महत्वाचा पुणे दौरा असणार आहे. दरम्यान, राज ठाकरेंची पुण्यात सभा 21 मे या दिवशी होणार आहे. डेक्कनला नदीपात्रात ही सभा होणार आहे. राज ठाकरे यांना पुण्यात सभेसाठी परवानगी देण्यात आलीय. पुणे पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली आहे.
राज ठाकरेंच्या सभेसाठी जागा फायनल झाली आहे. डेक्कन नदी पत्रात आता सभा होणार आहे. आधी सभेसाठी तीन जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, जागेत बदल करण्यात आला आहे. मनसेने डेक्कन पोलिसांना पत्र दिले आहे. 15 मे रोजी राज यांच्या सभेबाबत हे पत्र दिले होते. काल येथील जागेची पाहणी करण्यात आली. आता परवानगी मिळाल्याने नदी पत्रात राज ठाकरे यांची सभा होणार आहे.
- पुण्यातील पदाधिका-यांची आज महत्वपूर्ण बैठक
- पक्षांतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा
- वसंत मोरेंची नाराजी दूर करण्यात यश येणार?
- दोन दिवसांच्या दौऱ्यात वसंत मोरे राज ठाकरे यांची भेट घेणार
- राज यांच्या मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्याविरोधात भूमिका घेतल्यानं वसंत मोरे चर्चेत
- पुढील दोन दिवस राज ठाकरे पुण्यात
- राज ठाकरे यांची पुढील सभा डेक्कन येथील नदीपात्रात होणार
- त्याआधी पुण्यात महत्वपूर्ण बैठक
दरम्यान, मनसे शहर पदाधिकारी आजपासून अयोद्धा दौऱ्याच्या नोंदणीला सुरुवात झालीय. मनसेकडून राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या नियोजनाला सुरुवात करण्यात आलीय. अयोध्या दौऱ्याच्या नोंदणीला सुरुवात होणारेय.नाव नोंदणीसाठी आधारकार्ड घेवून पक्ष कार्यालयात नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलंय. अयोध्या दौऱ्यासाठी किती नोंदणी होते याची उत्सुकता आहे.