रत्नागिरी : सध्या रत्नागिरी किनारपट्टी अद्भूत अशा निळाशार रंगाने उजळून निघतेय. रात्रीच्यावेळी समुद्र किनारी निळ्या रंगाच्या लाटा उसळताना दिसत आहेत.
रत्नागिरीतल्या भाटे, आरेवारे गुहागरच्या वेळणेश्वर किना-यांवर सध्या असं हे अद्भूत चित्र तुम्हाला रात्रीच्यावेळेस पहायला मिळेल. रत्नागिरीतले मच्छिमार याला पाणी पेटणं असं म्हणतात. मात्र लाटांबरोबर पेटणारं हे ल्पवंग असून त्याला इंग्रजीमध्ये नॉक्टीलीव्हका असं म्हणतात.
समुद्राच्या पाण्यासोबत हे सुक्ष्म जीव किना-यावर येतात आणि जेव्हा एखाद्या गोष्टीच्या संपर्क झाला की ते प्रकाशमान होता. जैविक प्रकाश निर्माण करण्याची क्षमता या प्लवंगांमध्ये असते. त्यामुळे तुम्हाला जर हा अद्भूत नजारा बघायचा असेल तर कोकणच्या किनारपट्टीवर तुम्हाला एक रात्र ही घालवावी लागेल.