मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसांनी राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्य सरकार कोरोनाचं संकट हाताळण्यात कमी पडत असल्याचं म्हटलं होतं. भाजपने राज्यपालांना याबाबत निवेदन दिलं. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत उत्तर दिलं आहे.
रोहित पवार यांनी म्हटलं की, 'फडणवीसजी, आरोप प्रत्यारोप सोडले तर आपण मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असून त्यावर महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री साहेब काम करतच आहेत. पण राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य ठरू शकेल.'
.@Dev_Fadnavis जी आरोप प्रत्यारोप सोडले तर आपण मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असून त्यावर #मविआ सरकार व मुख्यमंत्री साहेब काम करतच आहेत. पण राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य ठरू शकेल. https://t.co/kz2dIasaZ4
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 19, 2020
कोरोनाच्या या संकट काळात एखाद्या पक्षाच्या शिष्टमंडळाने जाण्याऐवजी जर देवेंद्र फडणवीस जी राज्याचे विरोधी पक्षनेते या भूमिकेतून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधायला गेले तर संवाद नक्कीच घडून येईल, अशी मला खात्री आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 20, 2020