नवी दिल्ली : पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी घेतलेली बैठक यशस्वी ठरल्याचे दिसते. पुण्यात गिरीष बापट यांच्या नेतृत्वाखाली भाजप काम करणार असल्याचं संजय काकडेंनी नमूद केलं आहे. संजय काकडे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली.
पुण्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे किंवा गिरीश बापट यांनी मला कोणतीही ताकीद दिली नाही, असं संजय काकडेंनी स्पष्ट केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपनं हरलेल्या जागांवर लक्ष केंद्रीत करायला मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असल्याचं काकडे म्हणाले.