Maharashtra Politics, मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी (patra chawl scam) शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केली होती. विशेष न्यायालयाने (PMLA Court) बुधवारी संजय राऊत यांना जामीन मंजून केला. तब्बल 102 दिवसानंतर संजय राऊतन आर्थर रोड जेलमधून जामिनावर बाहेर आले आहेत. संजय राऊत यांच्या सुटकेनंतर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत बाहेर आले मग नवाब मलिक आणि अनिल देशमुख आत का? असा प्रश्न उपस्थित करत उदय सामंत यांनी राष्ट्रवादीला डिवचले आहे. संजय राऊत यांच्या सुटकेनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच उदय सामंत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकारण तापणार आहे.
संजय राऊत बाहेर आले. पण, नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे दोन नेते अद्याप जेलमध्ये आहे. संजय राऊत फक्त 100 दिवसांत जेलमधून बाहेर आले. पण, या नेत्यांना अजून जामीन का मिळत नाही अशी. यामुळे या दोन नेत्यांच्या सुटेबाबत राष्ट्रीवादी पक्षात कुजबूज सुरु असल्याचे उदय सामंत म्हणाले.
राज्यात एक नवीन सरकार अस्तित्वात आले आहे. मी मागील तीन महिन्यांपासून जेलमध्ये होतो आणि आता बाहेर आलोय. या सरकारने काही चांगले निर्णयही घेतले आहेत. मी त्यांचं स्वागतही करतो. फक्त विरोधासाठी विरोध आम्ही कधी करणार नाही. ज्या गोष्टी राज्यासाठी, देशासाठी आणि इथल्या लोकांसाठी चांगल्या असतात त्यांचं नेहमी स्वागतच केलं पाहिजे, अस म्हणत राऊत यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या कौतुकावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणी काही टीका टिपण्णी करावी पण मुखमंत्री एकनाथ शिंदे जोरदार काम करतात. त्यामागे वेगळे काय राजकारण हे संजय राऊत सांगतील असा टोला त्यांनी लगावला.
31 जुलै 2022 रोजी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर सकाळी 7 वाजता ईडीने धाड टाकली. अनेक तासांच्या मॅरोथॉन चौकशीनंतर गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांना अटक करण्यात आली आहे. तर, नवाब मलिक यांना यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसिना पारकरचा हस्तक सलीम पटेल याच्याकडून मालमत्ता खरेदी केल्याचा आरोपाखाली ईडीने अटक केली आहे. तर, अनिल देशमुख यांना कथित 100 कोटी वसुली प्रकरणात अटक झाली आहे.