सांगली : कुरळप निनाई प्राथमिक आश्रम शाळेत पाच अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराप्रकरणी संतप्त झालेल्या पालकांनी आणि गावकऱ्यांनी आश्रम शाळेची तोडफोड केलीय. शाळेच्या मुख्याध्यापकलाही चांगलेच बदडून काढलेय. चपल आणि डोक्यात खुर्च्या टाकून चांगलीच अद्दल घडविण्यात आलेय.
कुरळपमधल्या निनाई प्राथमिक आश्रमशाळेत पाच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालंय. तर इतर तीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याचंही स्पष्ट झालंय. याप्रकरणात शाळेचा संस्थापक अरविंद पवारला पोलिसांनी अटक केलीय.
पीडित मुलींनी निनावी पत्राद्वारे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणात अरविंद पवारला साथ देणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अत्याचार करण्यापूर्वी अरविंद पवार मुलींना काही गोळ्या खायला देत असल्याचंही तपासादरम्यान समोर आलंय.