मी बाजूला जातो, परत येताय का?, संजय राऊतांची शिंदे गटाच्या आमदारांना साद

Sanjay Raut On MLA: संजय राऊतांनी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेंवरही टीकास्त्र सोडलंय. उद्धव ठाकरेंनी शिंदेंना सर्व पदं दिली, आमदारकी दिली. मात्र शिंदेंनी गद्दारी केल्याचा आरोप राऊतांनी केलाय..

Pravin Dabholkar | Updated: Jul 8, 2023, 01:28 PM IST
मी बाजूला जातो, परत येताय का?, संजय राऊतांची शिंदे गटाच्या आमदारांना साद  title=

Sanjay Raut On MLA: शिवसेना नेते संजय राऊत हे दररोज पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटातील आमदारांवर टिका करत असतात. त्यामुळे संजय राऊतदेखील विरोधकांच्या निशाण्यावर असतात. 

दरम्यान संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांना साद घातली आहे. मी बाजूला होतो, ठाकरेंकडे तुम्ही परत येताय का? असा सवाल संजय राऊतांनी शिंदेंसह 40 आमदारांना विचारला आहे.

एकीकडे हे आवाहन करत असताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेंवरही टीकास्त्र सोडलंय. उद्धव ठाकरेंनी शिंदेंना सर्व पदं दिली, आमदारकी दिली. मात्र शिंदेंनी गद्दारी केल्याचा आरोप राऊतांनी केलाय..

'गद्दारांना दारात उभं करू नका ही लोकभावना, असल्याची टिका संजय राऊत यांनी केली. 

'चोर कोण आहे ते कळेल'

दरम्यान निवडणुका घ्या, चोर कोण आहे ते कळेल, अशी ही टिका राऊतांनी धडक मोर्चादरम्यान केली होती. खोके सरकारनं चष्मा लावून गर्दी पाहावी. हा ट्रेलर नाही आता पिक्चर सुरु झालाय.चोर आणि चोराच्या मोरांना धडा शिकवणार, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले होते. 

विरोधकांनी चष्मा आणून मोर्चा पाहावा. बीएमसीवर हनुमानाची गदा फिरवली आहे. 2024 ला सर्व चोर बिळात जाणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.