Maharashtra Heat Wave : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रभरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. नाशिकमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे नाशिक जिल्ह्या सह शहरात तापमानाचा पारा 40 पार गेलाय यामुळे उन्हाच्या झळा नाशिककरांना मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागत आहेत. नाशिककरांना उन्हाच्या झळा बसू नये त्याचबरोबर उष्माघाताचा फटका बसू नये यासाठी नाशिक पोलिसांनी अनोखा निर्णय घेतला आहे. शहरातील 60% पेक्षा सिग्नल हे दुपारी दोन वाजेपासून ते चार वाजेपर्यंत बंद असणार आहेत.
90% सिग्नल दोन ते चार वाजेपर्यंत बंद
दुपारच्या वेळेला उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढते यामुळे उष्माघाताचा परिणाम नागरिकांवर होऊ शकतो.. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो यासाठी नाशिक पोलिसांनी शहरातील 90% सिग्नल दोन ते चार वाजेपर्यंत बंद करणार आहे.. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते किंवा जास्त वर्दळ असते या ठिकाणचे सिग्नल मात्र सुरू असणार आहे.
दोन ते चार वाजेपर्यंत सिग्नल बंद असल्याचा निर्णय याचा स्वागत नागरिकांकडून केले पोलिसांनी घेतलेला निर्णय योग्य असून आम्ही याचं स्वागत करतो आणि पोलिसांचा आभार मानतो असे देखील सांगितलं शहरात तापमानाचा पारा वाढलाय यामुळे उष्माघाताचा परिणाम आमच्यावर होतोय आणि आरोग्य देखील खराब होते असे देखील नागरिकांनी सांगितलं पोलिसांनी घेतलेला निर्णय स्वागतहार्य आहे. मात्र नागरिकांनी सिग्नल बंद असला तरी वाहने व्यवस्थित चालावे असे देखील म्हटले त्याचबरोबर असा निर्णय महाराष्ट्रातल्या अति उष्ण भागात देखील घ्यावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता वाढली आहे यामुळे राज्यभरात उष्मघाताचे रुग्ण देखील सापडतात. अशा निर्णयामुळे नाशिक पोलिसांचं कौतुक होत असलं तरी नागरिकांनी काळजी घेण्याचा देखील गरज आहे.
नाशिक शहरात तीन दिवसांपासून पारा चाळिशीपार गेलाय. दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी पाचवाजता पारा थेट 40.7 अंशांवर गेला होता. दुपारच्या वेळेत घराबाहेर असणारे लोक सावलीचा आसरा घेताना दिसतायत. शीतपेयांची मागणी वाढलीय. तर मनपा प्रशासनही सज्ज आहे. बिटको रुग्णालयात उष्माघातासाठी स्पेशल रुम तयार केल्यात. मनपानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. शिवाय आवश्यकता नसेल तर दुपारी 12 ते 4 यावेळेत घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय .