धक्कादायक | अमरावतीत तलाठी कार्यालयातच अश्लील चाळे; गावकऱ्यांचा तलाठ्याला चोप

तलाठ्याने कार्यालयातचा एका महिलेला आणून अश्लील चाळे केल्याचा प्रकार ऊघडकीस आला आहे.  

Updated: Nov 26, 2021, 06:22 PM IST
धक्कादायक | अमरावतीत तलाठी कार्यालयातच अश्लील चाळे; गावकऱ्यांचा तलाठ्याला चोप title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तलाठ्याने कार्यालयातचा एका महिलेला आणून अश्लील चाळे केल्याचा प्रकार ऊघडकीस आला आहे. यामध्ये तल्याठ्याच्या मित्रांचाही समावेश होता. हा सर्व प्रकार उघड होताच गावकऱ्यांनी तलाठ्यासह त्याच्या मित्रांना चांगलाच चोप देत अद्दल घडवली. तर काही विकृत मित्र हे पळून गेले. या प्रकरणी गावकऱ्यांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. (Villagers took action against amravati Talathi officer For abusing women) 
  
व्ही भगत भगत हा जिल्ह्यातील नांदगाव खंडेशवर तालुक्यातील पिंपळगाव बैनाई गावाचा तलाठी.  भगतने बुधवारी तलाठी कार्यालयात एका महिलेला बोलावलं. यानंतर त्याने आपल्या एकूण 5 मित्रांनाही बोलावलं. यानंतर तलाठ्यासह त्याच्या मित्रांनी दारु ढोसली. या दरम्यान हे नराधम त्या महिलेसह कार्यालयातच विकृत चाळे करायला सुरुवात केली. या सर्व प्रकाराची माहिती गावकऱ्यांनी झाली. 

या सर्व प्रकाराची कुजबुज लागताच 5 ते 6 गावकऱ्यांनी तलाठी कार्यालय गाठलं. कार्यालयात सुरु असलेला प्रकार पाहून गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर गावकऱ्यांनी तल्याठ्यासह त्याच्या सहकाऱ्यांना चांगलाच तब्येतीचा चोप दिला. या दरम्यान तलाठ्याचे 3 मित्र पळून जाण्यात यशस्वी ठरले.

दरम्यान हा असा प्रकार तलाठी कार्यालयात घडण्याची पहिली वेळ नसून याआधीही अनेकदा सर्रासपणे असे प्रकार होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणंन आहे.  दरम्यान या सर्व प्रकाराबाबत गावकऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.