ट्रेनने वाटेल तेवढं सामान नेता येणार नाही, प्रवाशांचा तोटा नाही फायदाच; कसं ते समजून घ्या!

Western Railway Mumbai: वांद्रे स्थानकात झालेल्या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 30, 2024, 02:45 PM IST
ट्रेनने वाटेल तेवढं सामान नेता येणार नाही, प्रवाशांचा तोटा नाही फायदाच; कसं ते समजून घ्या! title=
Western Railway Said Passenger Luggage Beyond Permissible Limit To Attract Fine

Western Railway Mumbai: वांद्रे टर्मिनस येथे रविवारी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. यात 9 जणं गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय जारी केला आहे. प्रवासादरम्यान नेण्यात येणाऱ्या सामानासंदर्भात पश्चिम रेल्वेने एक नवीन आदेश जारी केला आहे. तसंच, रेल्वेने स्थानकात अधिक गर्दी न करण्याचं अवाहनदेखील केले आहे. 

रेल्वेच्या डब्यातील गर्दी व वर्दळ रोखण्यासाठी आता नियमापेक्षा अधिक सामान नेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रश्चिम रेल्वेने घेतला आहे. रेल्वेने त्यांच्या प्रत्येक प्रवाशांसाठी प्रवास करताना विशिष्ट प्रमाणात सामान घेऊन जाण्याची परवानगी देते. पण 100x100x70 सेमीपेक्षा अधिक आकाराचे आणि 75 किलोपेक्षा अधिक वजनाचे सामान प्रवासी डब्यातून नेल्यास प्रवाशांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. 

रेल्वेतून प्रवास करत असताना मोठ्या बॅगा प्रवाशांकडून नेण्यात येतात. त्यामुळं रेल्वे डब्यांमध्ये व फलाटांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र आता एक्स्प्रेसमध्ये प्रवास करताना 5 ते 12 वर्षांच्या व्यक्तीला तिच्या वजनाच्या निम्या वजनाच्या सामानासह प्रवास करण्याची मुभा आहे. तर, अन्य प्रवाशांना रेल्वे डब्यांच्या श्रेणीनुसार 35 ते 70 किलो सामान प्रवासी डब्यातून नेऊ शकतात. यात 10 ते 15 किलोपर्यंत सूट देण्यात येते. 

प्रवासी यापुढे स्कुटर, सायकलसारख्या वस्तु रेल्वेतून घेऊन जाऊ शकत नाही. 100x100x70 सेमीपेक्षा मोठ्या आकाराच्या सामानावर वजनामध्ये देण्यात येणारी सूट ग्राह्य धरली जाणार नाही. तसंच, पश्चिम रेल्वेने अवाहन केलं आहे की, स्थानकात प्रवाशांनी गर्दी करु नये. ट्रेनच्या वेळापत्रकानुसारच वेळेत स्थानकात प्रवेश करावा. 

वांद्रे स्थानकात नेमकं काय घडलं?

विवारी सकाळी सहाच्या सुमारास वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवली होती. अंत्योदय एक्स्प्रेस पकडताना ही चेंगराचेंगरी झाली होती. तसंच, रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त विशेष गाडीला उशीर झाला त्यामुळं ती गाडी रद्द करण्यात आली होती. त्यामुळं पाठीमागून येणाऱ्या वांद्रे ते गोरखपूरपर्यंत धावणारी अंत्योदय एक्स्प्रेस सुटणार होती. या ट्रेनसाठी बुकिंग किंवा रिझर्व्हेशन लागत नाही. त्यामुळं विशेष ट्रेनला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली होती. 

प्लॅटफॉर्म तिकिट विक्री

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे आणि नागपूर या रेल्वे स्थानकांवर आता प्लॅटफॉर्म तिकिटाची विक्री थांबवण्यात आली आहे. 8 नोव्हेंबरपर्यंत तिकिटाची विक्री या स्थानकांत करता येणार नाही, असं मध्य रेल्वेने घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या आजारी प्रवाशांनायातून सूट देण्यात आली आहे