अकोला : अकोल्यात भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. उपस्थित श्रोत्यांना 'मित्रो' म्हणणार नाहीय, असं म्हणत भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी मोदींना टोला लगावला.
सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटीवरील निर्णयावर चांगलीच टीका केलीय. नोटबंदी पूर्णपणे अपयशी ठरलीय. नवीन रोजगार थांबलाय, कर्मचारी कमी केले जातायत. सरकारचे नेते आकड्यांचा खेळ करतात आणि मोठे आकडे फेकतात.
मात्र, आकडेबाजीच्या खेळानं देशाचं भलं होत नाही, असंही यशवंत सिन्हा म्हणाले. आता राजशक्ती विरोधात लोकशक्ती उभारायची गरज आहे आणि त्याची सुरूवात अकोल्यातून करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. संघर्ष करायला वयाची कोणत्याच सिमा नसतात असं म्हणत यशवंत सिन्हांनी जेटलींना टोला लगावला आहे