औरंगाबाद : औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलला पुरवठा झालेल्या रॅनिटीडीन इंजेक्शनमध्ये काळपट बुरशी आढळल्याने खळबळ उडालीय. त्यामुळे या इंजेक्शनचा वापर थांबवण्यात आलाय. अॅसिडीटीसाठीची रॅनिटीडीन ही तब्बल ७० हजार इंजेक्शन पुरवण्यात आली होती. हाफकीनने नियुक्त केलेल्या कंपनीकडून हा पुरवठा कऱण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी डॉक्टरांना यात काळपट बुरशी आढळली.
औषध तुटवटा
शस्त्रक्रिया, प्रसुती, दुर्धर आजारात प्रतिजैविकाचा वापर केल्याने होणाऱ्या अॅसिडीटीच्या नियमनासाठी या रॅनिटीडीनचा वापर होतो.
विशेष म्हणजे याआधी हॉस्पिटलला औषधाच्या पुरवठ्यातल्या तुटवड्यामुळे इथे गोंधळ उडाला होता.
त्यानंतर तब्बल १२ महिन्यांनी हाफकिन महामंडळाकडून घाटी हॉस्पिटलला अतिमहत्त्वाच्या १४३ पैकी २७ औषधांचा पुरवठा झाला होता.
त्यातील या इंजेक्शनमध्ये काळपट बुरशी आढळल्याने संताप व्यक्त होतोय.