Shinde-Fadnavis Cabinet expansion : राज्यात लवकरच शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबतच्या (Unuon Home minister Amit Shah) बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ही माहित दिली (Shinde-Fadnavis Cabinet expansion). दिल्लीत शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कमोर्तब झाला असताना राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या गंभीर दाव्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिक्कमोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळलाी आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत विस्ताराचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांनीही लवकरच विस्तार होणार असल्याचं बैठकीनंतर सांगितले. विशेष म्हणजे आधी शाह-शिंदे आणि फडणवीसांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर शाहांनी फडणवीसांसोबत स्वतंत्र बैठक घेतली.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रणच दिलं नव्हतं, असा दावा आता राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. माहितीचा अधिकारातून (RTI) ही माहिती मिळाल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासेंनी केला. मात्र, राष्ट्रवादीचा हा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोडून काढला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कागदपत्र राज्यपालांकडे आहेत, राज्यपाल कार्यालयाकडे नाहीत असं आरटीआयमध्ये म्हटल्याचं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. यानंतर 12 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. खाते वाटप जाहीर करण्यासही शिंदे-फडणवीस सरकारने विलंब केला. यानंतर आता चर्चा रंगलेय ती दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची. यामुळे सगळ्यांचेच लक्ष या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे.