मुंबई : मुंबईकर प्रवासी गेल्या वर्ष भरापासून आतुरतेने वाट पाहत असलेली ए सी लोकल 25 डिसेंबर पासून पश्चिम रेल्वे वरील प्रवाश्यांच्या सेवेत दाखल होणार आहे.
या वातानुकूलित लोकलसाठी सध्याच्या प्रथम श्रेणीच्या भाडयापेक्षा अधिक दर मोजावे लागणार आहे. अंधेरी ते चर्चगेट मार्गावर या लोकलची पहिली फेरी धावणार आहे.
अंधेरी स्थानकातून सोमवारी दुपारी २.१० मिनिटांनी वातानुकूलित लोकलची पहिली फेरी चर्चगेटच्या दिशेने रवाना होईल आणि चर्चगेटला दुपारी २.४४ मिनिटांनी पोहचेल. वातानुकूलित लोकलचे पासधारक हे प्रथम श्रेणीच्या डब्यातूनही प्रवास करू शकतील या लोकलच्या १२ फेऱ्या दररोज चालवण्यात येणार आहेत..