मुंबई : अभिनेता तसंच काँग्रेसचे नेते राज बब्बर आणि माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन हे देखील आगामी निवडणूकीत आपल्याला मुंबई मतदार संघातून निवडणूक लढताना दिसू शकतात. तशा प्रकारची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतून लोकसभा निवडणूकीसाठी ते दोघेही इच्छुक आहेत. मुंबईतून निवडणूक लढवण्याची इच्छा या दोघांनी काँग्रेसच्या नेत्यांकडे व्यक्त केली आहे. राज बब्बर हे उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तर अझरुद्दीन हे तेलंगणा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. आपापलं राज्य सोडून हे दोघंही मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. अझर उत्तर मध्य मुंबईमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
याच मतदार संघातून गेल्या वेळी निवडणूक लढवलेल्या माजी खासदार प्रिया दत्तसुद्धा इच्छुक आहेत. याशिवाय अभिनेत्री नगमा आणि माजी आमदार कृपाशंकर सिंह यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. दुसरीकडे राज बब्बर हेही मुंबईतील एका मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यापूर्वी २०१४ साली बब्बर हे उत्तर प्रदेशातील आग्रा लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते.