मुंबई : मुंबईतील काही भागात आज पुन्हा मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 3 हजार 277 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. 2010 मध्ये 3 हजार 327 मिमी पाऊस झाला होता. तर 2011मध्ये 3 हजार 154 मिमी पाऊस झाला होता. गेल्या 8 वर्षात मात्र 3 हजार मिमी पावसाची नोंद झाली नव्हती. ठाणे जिल्ह्यातही यंदा पावसाचा कहर पाहयाला मिळतोय. ठाणे जिल्ह्यात यंद्याच्या मोसमात तब्बल 3 हजार 947 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून मान्सूनचा पाऊस कोकण आणि गोव्यात अजूनही सक्रीय असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे.
मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. गेल्य़ा 2 दिवसांमध्ये देखील पावसाने विश्रांती घेतलेली नाही. रविवारी देखील मुंबईत जोरदार पाऊस झाला. दादर, सायन, कुर्ला भागात जोरदार पाऊस झाला. सखल भागात काही प्रमाणात पाणीही साचलं आणि याचा परिणाम वाहतुकीवर ही पाहायला मिळाला. सकाळपासून जरी पावसाचा जोर कमी असला तरी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.