मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं जाणार असल्याचं नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय. भविष्यात दुसऱ्या मोठ्या प्रकल्पाला दि. बा. पाटलांचं नाव दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी संघर्ष समितीला दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी वाढली आहे. पण राज्य सरकार देखील आपल्या भूमिकेवर ठाम दिसत आहे. नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण या निर्णयाला स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध आहे.
आजच ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साखळी आंदोलन करण्यात आलं. भाजप, मनसे, रिपब्लिक पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला आहे. या मागणीसाठी सिडको भवनला घेराव घातला जाणार आहे. अशी माहिती देखील संघर्ष समितीने दिली होती. त्यामुळे आता संघर्ष समितीच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.