वांद्रे येथील 'ती' आग लागली नव्हती, लावली होती

शबीर खान असं या आग लावणाऱ्या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला नुकतीच अटकही केली आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 30, 2017, 12:39 PM IST
 वांद्रे येथील 'ती' आग लागली नव्हती, लावली होती title=

मुंबई : मुंबईतल्या वांद्रे भागात गुरुवारी  भीषण आग लागली होती. ही आग लागली नाही तर लावली होती, असं पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. शबीर खान असं या आग लावणाऱ्या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला नुकतीच अटकही केली आहे.

गरीबनगरमध्ये बीएमसीने सुरू केलेली अतिक्रमण विरोधी कारवाई रोखण्यासाठीच त्याने ही आग लावली होती असे पोलीस तपासात समोर आले आहे. 

कारवाई सुरू होत असतानाच आरोपी शबीर याने आधी कचरा पेटवला आणि मग त्यात सिलेंडर टाकले. त्यामुळे या परिसरात मोठी आग भडकली होती. सुदैवानं यात जीवितहानी झाली नव्हती, पण अनेक झोपड्या जळून खाक झाल्या.

शबीर खानचे गरीब नगर मध्ये कपड्याचं दुकान ही अनाधिकृत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पालिकेची तोड कारवाई थांबावी म्हणून शबीरनं ही आग लावल्याचं चौकशीत पुढे आले आहे.