मुंबईत या व्यक्तीकडे १०० कोटींची घरं

मुंबईत किमान हक्काचं एक घर असावं अशी अनेकांची इच्छा असते. पण मुंबईत १०० कोटींचं घर घेणार्‍या काही मोजक्याच लोकांच्या यादीमध्ये आता अजून एका नावाची भर पडली आहे. 

Updated: Oct 30, 2017, 03:53 PM IST
मुंबईत या व्यक्तीकडे १०० कोटींची  घरं   title=

नवी दिल्ली : मुंबईत किमान हक्काचं एक घर असावं अशी अनेकांची इच्छा असते. पण मुंबईत १०० कोटींचं घर घेणार्‍या काही मोजक्याच लोकांच्या यादीमध्ये आता अजून एका नावाची भर पडली आहे. 

मुंबईतील उद्योजक कुमारपाल  जैन यांच्याकडे १००  करोडोंची घरी आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये जैन यांनी ४९ करोड रूपयांचे घर विकत घेतले. त्यानंतर दोन महिन्यांमध्येच त्यांनी दुसरे घरदेखिल विकत घेतले आहे. 

उद्योगपती मुकेश अंबानींच्या अ‍ॅन्टिलिया जवळच जैन यांनी एका टोलेजंग इमारतीमध्ये ३४ आणि ३५ व्या मजल्यावर घर विकत घेतले आहे. 

जैन यांनी दुसरा फ्लॅट विकत घेताना सुमारे ४८.७२ कोटी रूपये आणि त्यावर २.४३ कोटी रूपयांची स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी  भरली  आहे.  त्यामुळे जैन यांचे दोन्ही फ्लॅट  मिळून सुमारे १०० कोटींची घरं त्यांच्याकडे आहेत.