मुंबई : बेस्ट कामगार संघटनेने पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट'चे ३० हजार कर्मचारी ८ जानेवारीपासून संपावर जाणार आहेत. संपाच्या निर्णयासाठी गुरुवारी बेस्टच्या सर्व आगारांत मतदान झाले होते. या मतदानाची आज मतमोजणी झाली. या मतमोजणीत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिल्याने संपावर जाण्याचा निर्णय संघटनेने घेतलाय.
संपावर जायचे की नाही, यासाठी बेस्टच्या सर्व आगारांमध्ये गुरुवारी मतदान घेण्यात आले होते. एकूण १५ हजार २११ कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यातील ९५ टक्के म्हणजेच, १४ हजार ४६१ मते संप करण्याच्या बाजूने पडली. त्यामुळे आता ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेस्टचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.
बेस्ट आणि मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प एकाच वेळी जाहीर करावा, २०१६-१७ आणि २०१७-१८मधील बोनसबाबतचा तोडगा तातडीने काढावा या प्रमुख मागण्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आहेत. त्यासाठीच हे संपाचे उत्यार उपसण्यात आलेय.
- बेस्ट कामगार संघटना पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसणार
- ७ जानेवारी २०१९ च्या मध्यरात्रीपासून बेस्ट कामगारांचा बेमुदत संप
- ३० हजार कर्मचारी जाणार संपावर
- संप करावा की नाही याबाबत झालेल्या मतदानात ९५ टक्के कर्मचा-यांनी संप करण्याच्या बाजूने कौल दिला
- बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये समाविष्ट करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी तात्काळ करण्याची मागणी
- नव्या वेतनकराराच्या वाटाघाटी सुरू कराव्यात, अनुकंपा तत्वावरील भरती सुरू करावी, पालिका कर्मचा-यांइतका बोनस मिळावा या देखील संघटनांच्या मागण्या आहेत