मुंबई : बहुप्रतिक्षित अशा bihar assembly election result date 2020 बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. ज्यामध्ये एनडीएला यश मिळाल्याचं स्पष्ट झालं. असं असलं तरीही या रणधुमाळीमध्ये खरी रंगत ही तेजस्वी यादव यांनीच आणली अशा आशयाचं वक्तव्य शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं.
बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. बिहारमध्ये निवडणूक एनडीए जिंकली आहे. पण मॅन ऑफ द मॅच तेजस्वीच tejaswi yadav ठरले आहेत, असं ते म्हणाले. मुळात या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला जात असेल तर तो विनोद ठरेल असंही ते म्हणाले. चिराग पासवान यांच्यामुळं नितीशकुमारांचे २० उमेदवार पडले, ही बाब त्यांनी यावेळी अधोरेखित करत लक्ष वेधलं.
सध्याच्या घडीला हाती आलेले आकडे पाहता हे काठावरचं बहुमत आहे असं म्हणत बहुमत चंचल असतं किंबहुना ते किती स्थिर असेल याची खात्री नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.
२०२४ लोकसभा निवडणुकीत तेजस्वी खूप काही करू शकतील असा विश्वास व्यक्त करत पराभूत झालेले नितीश कुमार nitish kumar मुख्यमंत्रीपदावर येत असण्यावर त्यांनी टीका करत सध्या बिहार अस्थिर असल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी केलं.