Mumbai News : हॉटेल ताजला (Taj Hotel) बॉम्बने उडवण्याची धमकी मिळताच या बातमीने मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अडचणी वाढल्या आहेत. हॉटेल ताजवर याआधीही दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी हा कॉल गांभीर्याने घेतला आणि फोन करणाऱ्याला लगेचच अटक केली. 14 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास धरमपाल सिंह नावाच्या व्यक्तीने मुंबई अग्निशमन (Mumbai Fire Bridge) दलाला फोन करून ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती. ताज हॉटेलमध्ये बॉम्बचा स्फोट होईल आणि तुम्हाला हवे ते करा, असेही त्याने फोनवर सांगितले होते.
पोलिसांनी सांगितले की त्यांनी संपूर्ण हॉटेलची तपासणी केली असता काहीही सापडले नाही. मुंबईतील कुलाबा पोलिसांनी आयपीसी कलम 506 (2) अन्वये फोन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपी धरमपाल सिंहने फोन केल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य पाहून अग्निशमन दलाने तत्काळ मुंबई पोलिसांना माहिती दिली होती. ताबडतोब पोलीस आणि बॉम्बशोधक पथक ताज हॉटेलमध्ये पोहोचले आणि हॉटेलच्या परिसराची झडती घेतली. तासभर चाललेल्या तपासामध्ये काहीही संशयास्पद आढळले नाही. यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांना आरोपीचे दिल्लीतील लोकेशन दिल्लीत सापडलं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी धरमपाल सिंह याला दिल्लीतून अटक केली आहे.
धरमपाल सिंह हा नवी दिल्लीतील लक्ष्मी नगर भागातील रहिवासी आहे. बॉम्बबद्दल निनावी कॉल आल्यानंतर पोलिसांनी कॉलरच्या नंबरची चौकशी केली. फायर ब्रिगेड कंट्रोलला फोन करण्यापूर्वी त्याने मुंबई पोलिस कंट्रोल रूमला 28 वेळा फोन केल्याचे समोर आले आहे. मुंबईतील कुलाबा पोलिसांनी सिंग यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, धरमपालने बॉम्ब ठेवल्याा खोटा कॉल का केला, याचा तपास पोलीस करत आहेत.
Mumbai Police has arrested a 36-year-old man namely Dharampal Singh for making a call to the Mumbai fire brigade control room and saying that he is going to place a bomb at the Taj hotel in Mumbai. Police checked the Taj Hotel and did not find anything. Mumbai's Colaba Police… pic.twitter.com/1DkvCAWNta
— ANI (@ANI) October 15, 2023
बॉम्बच्या अफवेसह वारंवार फोन येत असल्याने मुंबई पोलीस त्रस्त झाले आहे. प्रत्येक वेळी अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिस अलर्ट मोडवर येतात. पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठवले जाते, परंतु कोणतीही संशयास्पद कृती न आढळल्याने कॉल खोटा असल्याचे गृहीत धरले जाते. आतापर्यंत अनेक प्रकरणांमध्ये खोटी माहिती देणाऱ्यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.