Devendra Fadnavis Demand: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं (Chhatrapati Sambhaji Maharaj) नाव देण्याची घोषणा रविवारी केली. गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये भाषण देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. या घोषणेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण यासंदर्भातम मार्च महिन्यात पत्र लिहून मुख्यंत्र्यांकडे मागणी केल्याचं म्हटलं आहे. तसेच ही मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. त्यांनी शेअर केलेल्या पत्रामध्ये वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात यावे अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.
"छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य, बलिदान नव्या पिढीला दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. राज्यातील गड, किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही जागांचा विकास आराखडा राबविण्यात येत आहे. हा ऐतिहासिक ठेवा येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे. मुंबईतील कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा उभारला जाईल. तसेच मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे)ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल," असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच, मराठा समाजबांधवांना सर्व सोयीसुविधा देण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य, बलिदान नव्या पिढीला दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. राज्यातील गड, किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही जागांचा विकास आराखडा राबविण्यात येत आहे. हा… pic.twitter.com/BQ3uSI7WF3
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 14, 2023
फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्विटचा संदर्भ देत एक पत्र शेअर केलं आहे. "मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार! 16 मार्च 2023 रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी त्यांच्याकडे केली होती आणि आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यासंदर्भातील घोषणा त्यांनी केली, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा सुद्धा उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले आहे. ही छत्रपती संभाजी महाराजांना संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आज जयंतीदिनी अनोखी आदरांजली आहे," असं फडणवीस म्हणाले आहेत.
पत्रामध्ये वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावकर यांचे नावे देण्यात यावे, अशी मागणीही केली आहे. त्याचप्रमाणे मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, असंही फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे. "महापुरुष, महानीयांच्या कार्याची येणाऱ्या पिढ्यांना सतत प्रेरणा मिळत रहावी या हेतूने आपण याम मागण्यांवर सत्वर निर्णय घ्याल. ही वंनती," असंही फडणवीस यांनी या पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.
मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!
16 मार्च 2023 रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी त्यांच्याकडे केली होती आणि आज… https://t.co/QvApZi6JSZ pic.twitter.com/XGCtCpcblg— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 14, 2023
मुंबईला चांगली कनेक्टीव्हीटी देणाऱ्या या तिन्ही प्रकल्पांचं काम वेगाने सुरु आहे. मात्र प्रकल्पाचं काम पूर्ण होण्याआधीच या रस्त्यांना नावं देण्यावरुन राजकीय नेत्यांकडून मागण्या होत असल्याचं चित्र दिसत आहे.