Devendra Fadnavis On Lalit Patil: ललीत पाटील याला 10 डिसेंबर 2020 या तारखेला अटक झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना नाशिकचे शिवसेनेचे प्रमुख केले होते. अटक झाल्यानंतर पीसीआर मागितला आणि 14 दिवसांचा पीसीआर मिळाला. यानंतर ते ससूनला दाखल झाले. सरकारी पक्षातर्फे कोर्टाला अर्जदेखील करण्यात आला नाही. चौदाव्या दिवशी त्यांचा एमसीआर केला. पण गुन्हेगाराचे इन्ट्रोगेशनच केले नाही. ललीत पाटीलचे इन्ट्रोगेशन का केले नाही? असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला.
आता कोणाची नार्को टेस्ट व्हायला हवी, हे ठरवा असे फडणवीस म्हणाले.
मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे. 2 ऑक्टोबर 2023 रोजी ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. साकिनाका पोलिसांच्या टिमने मोठी कामगिरी केली आहे. दरम्यान ललित पाटील याला वैद्यकीय चाचणीसाठी अंधेरी येथे आणण्यात आले. यावेळी त्याने माध्यमांच्या कॅमेरासमोर मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ललित पाटील हा चेन्नई येथे लपून बसल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने चेन्नई गाठून सापळा रचला आणि ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या. ललित पाटील याला आता मुंबईत आणलं गेलं असून लवकरच कोर्टात सादर करण्यात येणार आहे. ललीत पाटील 300 कोटींची ड्रग्ज फॅक्टरी चालवतो. त्यामुळे त्याचे नेटवर्क देशभरात पसरले आहे. यामुळे पोलिसांना ललित पाटीलला पकडणे खूप कठीण गेले.
ललीत पाटीलला अंधेरीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आले आहे. यानंतर त्याला पुणे कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. ललीत पाटील पुण्याहून नाशिकला गेला होता असे समोर येत आहे. नाशिकनंतर तो इंदौरला गेला. इंदौरनंतर तो गुजरात सुरतला गेला. यानंतर तो पुन्हा नाशिकला आला. यानंतर धुळे, संभाजीनगर, कर्नाटक, बंगळूर, चैन्नईपर्यंत प्रवास केला. यानंतर तो श्रीलंकेत जाण्याच्या तयारीत होता, असे सांगण्यात येत आहे. मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवून नेलं..कोणाचा हात आहे सर्व सांगेन असा गौप्यस्फोट ललीत पाटीलने केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कॅमेरासमोर ललीत पाटीलने हा गौप्यस्फोट केला आहे.