मुंबई : मगर हा हिंस्त्र प्राणी. पण, एक मगर शिकारीच्या शोधात महाराष्ट्रातल्या रस्त्यावर फिरत असल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच ही व्हायरल व्हीडिओतली मगर महाराष्ट्रात फिरतेय का, याची आम्ही पडताळणी केली. मग काय पोलखोल झाली चला पाहुयात. (fact check viral polkhol crocodile old video viral on social media)
पाण्यातील सैतान समजल्या जाणा-या या महाकाय मगरीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. ही मगर शिकारीच्या प्रयत्नात असल्याचा दावा करण्यात आलाय. महाकाय मगर महाराष्ट्रातल्या रस्त्यांवर फिरत असल्याचा दावा केल्यानं अनेकांच्या मनात धडकी बसलीय. कारण, अनेक ठिकाणी नदीमधल्या मगरी बाहेर फिरत असल्याचं आढळून आलंय.
त्यामुळे ही मगर आपल्या आजूबाजूला तर नाही ना अशी भीती निर्माण झालीय. बघा ही मगर कशी नदीतून पुलावर चढतेय आणि बघताच क्षणी ती पुन्हा नदीतल्या पाण्यात जाते.
त्यामुळे ही मगर कधी हल्ला करेल त्याचा नेम नाही. मगरीच्या या रुद्राअवतारामुळे ही मगर आपल्या नदीत तर नाही ना...? खरंच ही मगर शिकारीच्या शोधात आहे का? ही मगर कुठे दिसली? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी या व्हिडिओबाबत काय पोलखोल झाली पाहुयात.
नदीत फिरणाऱ्या मगरीचा व्हिडिओ जुना आहे. या मगरीचा व्हिडिओ याआधीही व्हायरल झाला होता. ही मगर कुठली आहे ते कळू शकलेलं नाही. असे व्हिडिओ व्हायरल करून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय...पण, हा व्हिडिओ जुना असून, अशा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका.