लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खास 'स्लोगन्स'

सात दिवसांच्या मुक्कामानंतर गणपती बाप्पा आज निरोप घेणार आहेत. गणपती बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण वातावरणच आनंदमय झाले होते. मात्र, आज आपले लाडके बाप्पा निरोप घेणार असल्यामुळे त्यांचे भक्त भावुक झाले आहेत. तरीही बाप्पाला निरोप देण्याची तयारी सर्वत्र झाली असून थोड्याच वेळात मिरवणुका निघणार आहेत.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 31, 2017, 04:50 PM IST
लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खास 'स्लोगन्स' title=

मुंबई : सात दिवसांच्या मुक्कामानंतर गणपती बाप्पा आज निरोप घेणार आहेत. गणपती बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण वातावरणच आनंदमय झाले होते. मात्र, आज आपले लाडके बाप्पा निरोप घेणार असल्यामुळे त्यांचे भक्त भावुक झाले आहेत. तरीही बाप्पाला निरोप देण्याची तयारी सर्वत्र झाली असून थोड्याच वेळात मिरवणुका निघणार आहेत.

श्रीगणेश चतुर्थीला सर्वत्र बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. घरगुती बाप्पाच्या सजावटीपासून ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या डेकोरेशनपर्यंत सर्वत्र भाविकांची लगबग पहायला मिळाली. आता सात दिवसाचे बाप्पा आपल्या घरी परतणार असल्यामुळे अनेकांचे डोळे पाणावले आहेत. मात्र, तरिही बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविक ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...’ यांसारखे अनेक स्लोगन्सही देतात. पाहूयात भाविकांनी आपल्या बाप्पांसाठी बनविलेले काही स्लोगन्स....

गणपती बाप्पा मोरया....
पुढच्या वर्षी लवकर या....

कहा चली ओ गोरिया....
गणपती बाप्पा मोरया....

ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार...
गणपती बाप्पा सुपरस्टार...

व्हिडिओकॉन, सॅमसंग...
गणपती बाप्पा हॅण्डसम...

ना चायना, ना कोरिया...
गणपती बाप्पा मोरया...

एक रुपये में च्विंगम
गणपती बाप्पा सिंघम

लाल फूल, पिवळे फूल
गणपती बाप्पा ब्युटीफूल

एक, दोन, तीन, चार
गणपती की जय जयकार
पाच, छे, सात, आठ
गणपती है सबके साथ

निरोप घेतो आता..
आम्हा आज्ञा असावी..
चुकले आमचे काही..
त्याची क्षमा असावी....

गणपती चालले गावाला
चैन पडेना आम्हाला...

गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या....

अशा प्रकारच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या, टाळ-मृदुंगाच्याद तालावर भाविक ठेका धरतील. यासोबतच मोठ-मोठ्या मिरवणुकांमध्ये भाविक सहभागी होत गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देणार आहेत.