Rain In Maharashtra : येत्या 4 ते 5 दिवसांत (17- 21 मे) दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. (IMD Alert about Rain in Maharashtra)
राज्यात सध्या वातावरणात वारंवार बदल पाहायला मिळतो आहे. राज्यावर मध्येच अवकाळी पावसाचं संकट येतं. यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.
अंदमानमध्ये 22 मेपर्यंत मान्सून दाखल होत असतो. पण यंदा 13 ते 19 मे दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये 20 ते 26 मे दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. तर कोकणात 2 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.