मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. कोरोनामुळे घराबाहेर पडणं ही कठीण झालं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच भावविश्व पूर्णपणेच बदलून गेलं आहे. लॉकडाऊनमुळे अचानक परीक्षा रद्द झाल्या. मे महिन्याच्या सु्ट्टीत कोरोनामुळे वाढ झाली आहे. शाळा कधी सुरू होणार? याबद्दल कुणीच काही बोलतं नाही. महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा मोकळेपणाने कधी खेळता येणार? याचं उत्तर कुणाकडेच नाही.
अशा परिस्थितीत पालकांना देखील आपल्या पाल्याची मानसिक स्थिती आणि शैक्षणिक स्थिती कशी सांभाळावी हे कळतं नाही. चोवीस तास डॉट कॉमने यासंदर्भात होम स्कुलिंग करणाऱ्या पालक शिल्पा परूळेकर यांच्याशी संवाद साधला. होम स्कुलिंगमधील काही गोष्टी आपण लॉकडाऊनच्या काळात अंगीकारू शकतो. याचा फायदा विद्यार्थ्यांच्या आताच्या परिस्थितीवर नक्कीच येऊ शकतो.
लॉकडाऊनमध्ये जग थांबलं असताना तुमच्या मुलांचं विश्व समृद्ध कसं कराल?याचं उत्तर शिल्पा परूळेकर यांनी फेसबुक लाईव्हमध्ये दिलं आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकदा घरात एक निराशेचं वातावरण असताना मुलांना सकारात्मक आणि गुंतवून ठेवण्यासाठी काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.
सरकारने देखील कोरोनाच्या पार्श्वभूमी शैक्षणिक पातळीवर काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रत्येक वर्गाकरता वेगळं चॅनल तयार केलं जाणार आहे. ई-शैक्षणिक पद्धतीचा स्विकार केला असून ऑनलाईन शिक्षण दिलं जाणार आहे. अनेक शाळांमध्ये हे पर्याय सुरू देखील झाले आहेत. पण यासोबतच आपण मुलाला दूरदृष्टी देणे देखील गरजेची आहे.
खाली काही संकेतस्थळांची माहिती दिली आहे. ज्यामार्फत तुम्ही तुमच्या पाल्याला अनेक गोष्टी शिकवू शकता. खालील संकेतस्थळ ही चर्चेत आलेल्या विषयामार्फत सुचलेली आहेत. याच्या प्रमोशनचा काही उद्देश नाही. फक्त विद्यार्थ्यांचा लॉकडाऊनमधील काळ सकारात्मक करण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.
Khanacademy.com - या संकेतस्थळाचा वापर सगळ्या वर्गातील विद्यार्थी करू शकतात.
Brainpop junior - बौद्धिक विकास करण्यासाठी
Scholastic Teachables - हसत खेळत शिका
Crayola For Educators - आर्टशी संबंधीत सगळ्या गोष्टी
Minecraft education - गेमिंगचे वेगळे पर्याय
ReadWriteThink - वाचन कौशल्य वाढवण्यासाठी
Google Earth - जगाचा भौगोलिक अभ्यास करण्यासाठी
Powtoon for presentation - ऑनलाईन कार्टून बनवू शकतो
Duolingo for languages - वेगवेगळ्या भाषा शिकण्यासाठी
San Diego Zoo for virtual trips - धार्मिक गोष्टी
Glogster - ऑनलाईन शिक्षण
Scratch - to learn programming
त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात शैक्षणिक पुस्तक बाजारात मिळणे शक्य नाही. अशावेळी ऑनलाईन मोफत पुस्तक डाऊनलोड करू शकतात. यासाठी खालील संकेतस्थळांचा वापर करू शकतो.
ebalbharati.in - SSC बोर्डाची सगळी पुस्तकं इथे उपलब्ध होतील.
ncert.nic.in - ncert ची पुस्तकं यामध्ये उपलब्ध होतील.
Project Gutenberg and open library या संकेतस्थळावर जगभरातील सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत.