Maharashtra Politics : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी शिंदे गटाच्या नेत्यावर अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. शिंदे गटाच्या नेत्यावर जितेंद्र आव्हाड यांनी थेट पक्ष फोडल्याचा आरोप केला आहे (Maharashtra Politics).
कळवा आणि मुंब्राच्या माजी नगरसेवकांना कोट्यवधींची ऑफर देण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. शिंदे गटाच्या पैशेवाल्या नेत्यांकडून खुलेआम एक कोटींची ऑफर माजी नगरसेवकांना दिली जात असल्याचा गंभीर आरोप आव्हाडांनी ट्विटद्वारे केला आहे.
पती आणि पत्नीला एक कोटी रुपये, महापालिका निवडणुकीचं तिकिट आणि 10 कोटींची कामं देण्याचं आमिष दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचं काम सुरु असल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हड यांनी दोन ट्विट केले आहेत. माझा बंधुतुल्य सहकारी जितू पाटील जो मागच्या निवडणूकीत निवडून आला होता; त्याला वेगवेगळी आमिष दाखवून पैशेवाल्यांच्या सेनेत घेण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी बटलू गद्दार हा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आता मोरयासारखे जाऊन तिथे 4-4 तास त्याच्या घरी बसाल, तर तो काय घरातून हालकून देईल असं ट्विट आव्हाड यांनी केले आहे.
पण आपण किती वेळ कोणाच्या घरी बसावं ह्याची तर लाज बाळगा. लोचटासारखे किती वेळ बसाल.
सगळेच धंदा करायला बसलेत आणि स्वतःचा विक्रीचा रेट लावतायेत असे समजू नका. काही स्वाभिमानी माणसं सुद्धा ह्या जगात जिवंत आहेत. पैशाने सगळ्यांनाच विकत घेता येतं हा डोक्यातला भ्रम काढून टाका असं ट्विट करत आव्हाड यानी शिंदे गटाच्या नेत्यावर निशाणा साधला आहे.
कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्यावर देखील जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे. याची ऑडिओ क्लीप देखील व्हायरल झाली आहे. बेकायदा बांधकामांसाठी पैसे घेता आणि ही बांधकामे पाडताना लोकांना आमची नावे सांगता, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्यावर केला आहे.