मुंबई : शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीपाठोपाठ (NCP) आता किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) आपला मोर्चा काँग्रेसकडं (Congress) वळवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यानंतर त्यांनी थेट टार्गेट केलंय ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi ) यांना. ठाकरे आणि गांधी परिवार एकाच हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून आपले बेनामी पैसे वळवत असल्याचा गंभीर आरोप सोमय्यांनी केलाय. एवढंच नव्हे तर त्यांच्यासाठी मनी लाँड्रिंग करणारा माणूस एकच असल्याचा सनसनाटी गौप्यस्फोट सोमय्यांनी केलाय. (kirit somaiya serious allegation on thackeray and gandhi family are transferring money through the same hawala operator)
कोण आहे उदयशंकर महावार?
उदयशंकर महावार असं या हवाला ऑपरेटरचं नाव आहे. ठाकरे आणि गांधी परिवाराचे हवाला व्यवहार तोच सांभाळतो, असा आरोप सोमय्यांनी केलाय. यशवंत जाधव बेनामी पैसे वळवायचे. त्यात उदयशंकर महावार या हवाला ऑपरेटरची महत्त्वाची भूमिका असल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.
दरम्यान, किरीट सोमय्यांच्या या आरोपांचा शिवसेनेनं साफ इन्कार केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्सनं धाडी घातल्या. त्यात आता सोमय्यांनी हवाला रॅकेटचे गंभीर आरोप केलेत.ठाकरे कुटुंबीयांना लवकरच ईडीची नोटीस येणार असल्याचे संकेत नारायण राणेंनी दिले होते. त्यामुळं शिवसेना चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.