Maharashtra Budget Session : 'बाळाला परत घ्या, नाहीतर गुवाहाटीला घेऊन जातील; डॉ. नीलम गो-हे यांचा शिंदे गटाच्या मंत्र्यांना टोला

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही प्रचंड गदारोळ पहायला मिळाला. विविध मुद्यांवरून दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक झाले होते. 

Updated: Mar 1, 2023, 12:24 AM IST
Maharashtra Budget Session : 'बाळाला परत घ्या, नाहीतर गुवाहाटीला घेऊन जातील; डॉ. नीलम गो-हे यांचा शिंदे गटाच्या मंत्र्यांना टोला title=

Maharashtra Budget Session 2023-2024:  शिंदे (Eknath Shinde) आणि फडणवीस (Devendra Fadnavis ) सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन (Mumbai News) सुरु आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे (NCP MLA Saroj Ahire) आपल्या चार महिन्याच्या बाळाला घेवून विधिमंडळात येत आहेत. सर्वच सदस्य या बाळाचे लाड करत आहेत. बाळाचे लाड करणाऱ्या शिंदे गटाच्या मंत्र्यांना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे (Legislative Council Deputy Chairman Dr. Neelam Gorhe) यांनी जोरदार टोला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांच्या बाळाला खेळवणा-या आरोग्यमंत्र्यांना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी जोरदार टोला लगावला... 'बाळाला परत घ्या, नाहीतर गुवाहाटीला घेऊन जातील, असा मार्मिक टोला त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना लगावला.  हिरकणी कक्षात सुविधा नसल्याबद्दल आ. अहिरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्र्यांनी आज हिरकणी कक्षाला भेट दिली. तेव्हा हा प्रसंग घडला.

 

नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात आमदार सरोज अहिरे लहान बाळाला घेऊन आल्या होत्या. तेव्हा त्यांचे बाळ फक्त अडीच महिन्यांचे होते.  आई आणि आमदार अशा दोन्ही जबाबदाऱ्या  राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे पार पाडत आहेत. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘हिरकणी कक्षा’ची दुरावस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.