मुंबई : बंधपत्रित ( बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. कोरोना लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळणार आहे. डॉक्टर्सना सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.
वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना ६० हजारांच्या ऐवजी ७५ हजार मानधन दिले जाणार आहे. आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना ७० हजार ऐवजी ८५ हजार मानधन दिले जाणार आहे. इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना ५५ हजारांऐवजी ७० हजार मानधन दिले जाणार आहे. इतर भ्गातील विशेषज्ञ डॉक्टर्सना ६५ हजारांऐवजी ८० हजार रुपये मानधन देण्यात येईल.
या संदर्भात कॅबिनेटमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.
For doctors on contract and on bond, the Maharashtra State Govt has decided to not just enhance pay, but bring at par. They are our covid warriors and this was due.
(1/n)— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 29, 2020
An older order had proposed a reduction in pay, and I had requested the government to reverse this. I wholeheartedly thank @CMOMaharashtra @OfficeofUT ji, Dy CM @AjitPawarSpeaks ji, Health Minister @rajeshtope11 ji and Minister @AmitV_Deshmukh ji to have reversed that.
(2/2)— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 29, 2020
मनसे नेते अमित ठाकरेंच्या प्रयत्नांना यश. बंधपत्रित डॉक्टरांसाठी केलेली मागणी मान्य करण्यात आली आहेत. डॉक्टरांची पगार कपात या विषयाकडे कुणीही गांभीर्याने बघत नव्हतं, अशा काळात मनसे नेते अमित ठाकरे यांनी बंधपत्रित डॉक्टरांच्या पगारकपातीच्या विरोधात आवाज उठवला. त्यांनी केवळ मुख्यमंत्र्याना पत्र लिहिलं नाही तर सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांची वैयक्तिक भेट घेऊनही या विषयावर चर्चा केली. बंधपत्रित डॉक्टरांचा पूर्ववत करावा, अशी मागणी केली. आरोग्यमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक आश्वासनही दिलं होतं. हरियाणासारख्या राज्यात वैद्यकीय व्यावसायिकांना सध्याच्या संकटकाळात दुप्पट पगार दिला जातोय, याकडेही अमितजींनी लक्ष वेधले होते.सर्व वैद्यकीय व्यावसायिक, बंधपत्रित डॉक्टर्स म्हणूनच आज अमित ठाकरेंचे आभार मानत आहेत.