मुंबई : १८९ पोलिसांना गेल्या ३६ तासांत कोरोनाची लागण झालीय. तर ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २२ हजार ८१८ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी सध्या ३ हजार १८८ जणांवर उपचार सुरू आहेत तर १९ हजार ३८५ पोलिसांनी कोरोनावर मात केली. तर २४५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कोरोनाचे रूग्ण वाढत असूनही नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्यामुळे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड नाराज झालेत. यापुढे एक महिना मुंब्र्यात कोणत्याही कार्यक्रमाला येणार नाही, अशी घोषणा आव्हाड यांनी केली आहे. मुंब्र्यात अद्ययावत रूग्णवाहिका सेवेचा शुभारंभ आव्हाड यांच्या हस्ते झाला. यावेळी मुंब्रा राष्ट्रवादीच्या काही हौशी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीचे आयोजन केले होते.
राज्यात काल रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा अधिक आहे. १९ हजार ९३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ११ हजार ९२१ रुग्ण वाढलेयत. सोमवारी १८० जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. तर राज्यातल्या एकूण रुग्णांचा आकडा १३ लाख ५१ हजार १५३ वर गेला आहे. तर आजवर राज्यात कोरोनानं ३५ हजार ७५१ जणांचा बळी गेला आहे. १० लाख ४९ हजार ९४७ जण आजवर राज्यात कोरोनामुक्त झाले आहेत.
6\