'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी लायक नव्हते, त्यांना...' भगतसिंग कोश्यांरीचा सनसनाटी आरोप

उद्धव ठाकरे यांनी मला विमानातून खाली उतरवलं, विधात्याने त्यांना सत्तेतून खाली खेचलं, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा टोला

Updated: Feb 20, 2023, 07:27 PM IST
'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी लायक नव्हते, त्यांना...' भगतसिंग कोश्यांरीचा सनसनाटी आरोप title=

BhagatSingh Koshyari : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी राज्यपालपद (Governor) सोडल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या राजकारणावर (Maharastra Politics) आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) खळबळजनक आरोप केले आहेत. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी लायक नसताना त्यांना जबरदस्तीने मुख्यमंत्रीपदी (Chief Minister) बसवण्याचा सनसनाटी आरोप महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केला आहे.  याचबरोबर कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना बळीचा बकरा बनवल्याचा आरोपही कोश्यारी यांनी केला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे योग्य नेते नव्हते त्यांनी पक्ष सांभाळायला हवा होता, असं मतही कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे. 

उद्धव ठाकरे यांनी मला विमानातून खाली उतरवलं, विधात्याने त्यांना सत्तेतून खाली खेचल्याचा टोलाही कोश्यारी यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे हे शांत स्वभावाचे, संत प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत, कोणाच्या तरी बोलण्यामुळे त्यांना जबरदस्तीने मुख्यमंत्री बनवण्यात आलं, असं कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा दिला राजीनामा
कोश्यारी यांनी आपण राज्यपालपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या भावना लक्षात घेता त्यांना पदभारमुक्त करण्यात आलं. कोश्यारी यांनी 3 वर्ष 4 महिने महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा कार्यभार सांभाळला. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती न केल्याने मविआ नाराज होते, पण त्यांची नाराजी स्वाभाविक होती, पण मविआ स्वत:च इतकं अस्थिर होतं की त्यांना काय करायचं हे कळत नव्हतं. त्यामुळे नियुक्तीचा कालावधी वाढत गेला असं स्पष्टीकरण भगतसिंग कोश्यारी यांनी दिलं.

तसंच ज्या विधेयकात कमी आहे, असेच विधेयक रोखले गेले, पण जे पूर्ण आहेत त्यांच्यावर रातोरात स्वाक्षरी केली असंही कोश्यारी यांनी स्पष्ट केलं.