'शारीरिक संबंध ठेव नाहीतर व्हिडीओ लीक करेन' दक्षिण मुंबईतल्या महिलेला जीम ट्रेनरसोबतची मैत्री पडली महागात

Mumbai Crime: आरोपीने महिलेकडून 70 हजार रुपये घेतले होते.  जेव्हा तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आणखी पैसे उकळण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलिसांनी आरोपीला विनयभंग आणि खंडणीच्या आरोपाखाली अटक केली.

Pravin Dabholkar | Updated: Jul 31, 2023, 12:55 PM IST
'शारीरिक संबंध ठेव नाहीतर व्हिडीओ लीक करेन' दक्षिण मुंबईतल्या महिलेला जीम ट्रेनरसोबतची मैत्री पडली महागात title=

Mumbai Crime: जीम ट्रेनरसोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. पैसे आणि शारीरिक संबध न ठेवल्यास व्हिडीओ लीक करेन अशी धमकी जीम ट्रेनरने महिलेला दिली. दक्षिण मुंबईतून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न जीम ट्रेनर करत होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 38 वर्षीय जिम ट्रेनरला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेकडून 70 हजार रुपये घेतले होते.  जेव्हा तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आणखी पैसे उकळण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलिसांनी आरोपीला विनयभंग आणि खंडणीच्या आरोपाखाली अटक केली.

पीडित महिला दक्षिण मुंबईतील जिममध्ये गेली होती जिथे आरोपी जिम ट्रेनर होता. कालांतराने, दोघे चांगले मित्र बनले आणि व्हॉट्सअॅपवर नियमितपणे बोलत होते. आरोपीने महिलेला अनेकदा व्हिडिओ कॉल केले होते. 

नंतर, त्याने महिलेला धमकावणे सुरू केले की आपण व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केले आहेत आणि ते सोशल मीडियावर अपलोड करु, अशी धमकी तो देऊ लागला. तसेच तक्रारदाराकडे महिलेकडे पैशांची मागणी करू लागला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

सुरुवातीला आपल्या प्रतिष्ठेला घाबरलेल्या महिलेने आरोपीला 70 हजार रुपये दिले. मात्र, आरोपीने तिच्याकडे आणखी पैशांची मागणी सुरुच ठेवली. आता आरोपीची हाव अजून वाढली होती. त्याने महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केली आणि व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी दिली. 

तेव्हा महिलेने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. जिथे जीम ट्रेनरविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. तिने दिलेल्या तपशिलांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला आणि शनिवारी रात्री त्याला अटक केली.

आरोपी जीम ट्रेनर हा महिलेला एका महिन्याहून अधिक काळ धमकावत होता. शेवटी न राहवून तिने तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. 

नोरा फतेही, सनी लिओनीनसोबत 'शो' चे खोटे स्वप्न

आपल्या सेलिब्रिटींसोबत ओळखी आहेत वैगेरे सांगून लुटण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये आरोपींकडून 9 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे.  उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सने फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. 

लखनऊच्या एकना स्टेडियममध्ये चित्रपट कलाकारांना बोलावून चॅरिटी शो आयोजित करण्याचे नाटक एक टोळी करत होती. या टोळीच्या सूत्रधारासह तीन आरोपींना एसटीएफने अटक केली आहे. एसटीएफने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी महाराष्ट्रातील पुणे येथून विराज त्रिवेदी आणि जयंतीभाई डेरवालिया यांना तर गुजरातमधील अहमदाबाद येथून समीर कुमार,जितेंद्रभाई शर्मा यांना अटक करण्यात आली आहे.