मुंबई : नायर हॉस्पिटलमध्ये एमआरआय मशीनमध्ये ओढले गेल्याने राजेश मारु या तरुणाचा हकनाक बळी गेला.
त्यामुळे राजेशचे नातेवाईक संतप्त झालेत. या नातेवाईकांनी राजेशच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप केलाय. नायर रुग्णालय प्रशासनाविरोधात राजेशच्या नातेवाईकांनी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केलंय. दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी केलीय. या प्रकरणी डॉक्टरसह वॉर्ड बॉयला अटक करण्यात आलं आहे.
मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये एमआरआय मशीनमध्ये ओढले गेल्याने राजेश मारु या तरुणाचा हकनाक बळी गेलाय. त्यामुळे राजेशचे नातेवाईक संतप्त झालेत. या नातेवाईकांनी राजेशच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप केलाय. नायर रुग्णालय प्रशासनाविरोधात राजेशच्या नातेवाईकांनी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केलंय. दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी केलीय.
रूग्णालयातील कर्मचाऱ्याने रूग्णाच्या नातेवाईकाला MRI रूममध्ये ऑक्सिजनचा सिलेंडर आणायचा असल्याच सांगितलं,नातेवाईकानं विरोध केला,मात्र MRIमशिन बंद असल्यानं सिलेंडर आत नेण्यास हरकत नसल्याच वॉर्ड बॉयने सांगितल. रूग्णाच्या नातेवाईकाने सिलेंडर आत नेला असता,सिलेंडर सकट ती व्यक्ती MRI मशीनमध्ये ओढली गेली आणि सिलेंडरचा व्हॉल्व लीक होऊन ऑक्सिजन बाहेर येऊ लागला.
राजेशचा हात MRI मशीनमध्ये अडकला. हे सगळ अनपेक्षित घडल्याने कोणीच काहीच करू शकलं नाही.अखेर वॉर्ड बॉयच्या मदतीने MRIमशीन बंद करून राजेशला बाहेर काढण्यात आल आणि ट्रॉमा सेंटरमध्ये हलविण्यात आलं.