मुंबई: राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत बुधवारी मोठी वाढ होताना पाहायला मिळाली. काहीवेळापूर्वीच पनवेलमध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. हा रुग्ण ३८ वर्षांचा असून काही दिवसांपूर्वीच तो त्रिनिनादमधून कामोठे येथे परतला होता. आज या व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. यानंतर त्याला मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वीही पनवेल परिसरात कोरोनाचा एक रुग्ण सापडला होता. मात्र, हा रुग्ण आता बरा होऊन घरी परतला आहे.
Lockdown:'अन्यथा राज्यात दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश द्यावे लागतील'
आज दिवसभरात राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी भर पडताना दिसली. आज सकाळीच सांगली येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर मुंबईत पाच आणि ठाण्यातील एका व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता यामध्ये पनवेलमधील रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १२३वर जाऊन पोहोचला आहे. देशात महाराष्ट्र हे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य आहे.
२४ तासांत कोरोनाचे सुमारे अडीच हजार बळी, स्पेनने चीनलाही टाकले मागे
दरम्यान, दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यातील एकूण १५ रुग्ण उपचारानंतर कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. यापैकी ८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आता या सर्वांना त्यांच्या घरी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल.