PM Modi to visit Mumbai : शुक्रवारी म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. 19 जानेवारीनंतर पंतप्रधानांची ही महिन्याभरात दुसरी मुंबई भेट आहे. या दौऱ्यात ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) या ठिकाणाहून दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस गाड्या मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या मार्गावर धावणार आहे.
सरकारच्या मेक इन इंडिया अंतर्गत बनवलेल्या या पहिल्याच हायस्पीड ट्रेन असल्याची माहिती आहे. मुख्य म्हणजे या गाड्या संपूर्णपणे एसी आणि वायफाय सुविधेने सज्ज आहेत. याशिवाय आधुनिक सस्पेन्शन तंत्रज्ञाना यामध्ये असून पुश बॅक सीट हे यांचं मुख्य आकर्षण आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांच्या उद्घाटनासोबतच पंतप्रधान मोदी मरोळमधील एका कार्यक्रमालाही हजेरी लावणार आहेत. पंतप्रधान मुंबईत येणार म्हणून पोलीस बंदोबस्ताची तयारी पूर्ण करण्यात आलीये. या दौऱ्यासाठी मुंबई पोलिसांनी ऑलआऊट ऑपरेशन केलं होतं. याचसोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
पंतप्रधानांचा मुंबईमध्ये येणार असून मुंबई पोलिसांचे 1000 जवान विशेष तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासाठी मुंबई पोलिसांचे 5 डीसीपी, 200 अधिकारी, 800 कनिष्ठ दर्जाचे अधिकारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आहे.