शिंदे गट-ठाकरे गटात आता 'दसरा' मेळाव्यावरून रस्सीखेच, कोणाला मिळणार परवानगी?

एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? कोण घेणार यंदा दसरा मेळावा.

Updated: Aug 27, 2022, 06:37 PM IST
शिंदे गट-ठाकरे गटात आता 'दसरा' मेळाव्यावरून रस्सीखेच, कोणाला मिळणार परवानगी? title=

मुंबई : शिंदे गट आणि ठाकरे गट (Eknath shinde and Uddhav Thackeray) आता दसरा मेळाव्यावरून आमने-सामने येणार आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात दसरा मेळाव्या (Dasara melava) वरून रस्सीखेच सुरू झाली आहे. 5 ऑक्टोबरला होणारा दसरा मेळावा शिवाजी पार्कात नेमका कोणी घ्यायचा याचा वाद पेटला आहे. ठाकरे गटाने परवानगीसाठी अर्ज केलाय. पण ठाकरे गटाच्या अर्जाला अजून महपालिकेकडून (BMC) कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याची सूत्रांची माहिती आहे. 

यंदा शिवसेनेत फूट पडल्यानंतर दसरा मेळाव्याचा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असताना, महापालिकेने मात्र हात आखडता घेतलाय. त्यामुळे आता संधी शिवसेनेला मिळणार, की एकनाथ शिंदे गटाला याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दसरा मेळाव्याबाबत नियमानुसार असेल ते करु अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहील. मात्र गद्दार सरकारने अजून परवानगी दिलेली नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

एकनाथ शिंदे यांना 40 आमदारांसोबत वेगळा गट स्थापन केल्यानंतर आम्हीची शिवसेना असल्याचा दावा केला आहे. आता शिंदे गटाने दसरा मेळाव्यावरही दावा करु शकते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये ही संभ्रम आहे.