Uddhav Thckeray Live : पक्षात एक आमदार असो की पन्नास पण आमदार गेले तर पक्ष संपत नाही, कारण आमदार गेले तरी पक्ष जाऊ शकत नाही. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे असं वक्तव्य शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे.
असे खेळ करण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या, आम्ही चुकलो असू जनतेचा निर्णय जो येईल तो आम्ह मान्य करु असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
जे आमदार आमच्याकडे आहेत त्यांनाही आमिष धमक्या देण्यात आल्या. पण ते बधले नाहीत. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, येत्या बारा तारखेला जो काही निकाल लागेल, तो निकाल केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा नसणार आहे, संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे. लोकशाहीची ताकद किती राहिली आहे हे संपूर्ण जग बघतंय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ज्यांनी विकृत टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत, त्यांच्याकडून स्वागत स्विकारत आहेत हे जनतेला कळू द्या, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
गेल्या दोन तीन दिवसात शिवसेनेतून इतके नगरसवेक गेले, तितके नगरसेवक गेले अशा बातम्या येत आहेत. मुळात महापालिका, पालिका आता अस्तित्वात नाहीए, ते त्यांचे वैयक्तिक कार्यकर्ते असू शकतात, त्यांच्याच आग्रहामुळे मी माझ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूनला ठेऊन यांच्या शिफारशीमुळे मी त्यांनी उमेदवारी दिली.
पण मला आजही एका गोष्टीचा अभिमान आहे, साधी साधी लोकं येतायत, राज्यातील महिला कार्यकर्त्या आल्या होत्या आणि वाघिणीसारख्या बोलत होत्या. शिवसेनेने आजपर्यंत साध्या माणसांना मोठं केलं. साधी माणसं जोपर्यंत शिवसेनेसोबत आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला कोणीही धोका पोहोचवू शकत नाही. कोणी चोरुन नेईल अशी शिवसेना नाहीए असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.